Type Here to Get Search Results !

एकनिष्ठा फाउंडेशनची माणुसकी रोडच्या बाजूला पडलेल्या बेवारस वृद्धास नेले दवाखान्यात*

 (खामगांव प्रतीनिधी) 


*








एकनिष्ठा फाउंडेशनची माणुसकी रोडच्या बाजूला पडलेल्या बेवारस वृद्धास नेले दवाखान्यात*


*दिनांक 30/08/2025*

खामगांव : येथील चौधरी वाईन शॉपी समोर सरकी लाईन स्थित एक बेवारस वृद्ध 5 दिवसापासून भरपावसात रोडच्या कडेला गंभीर जखमी आजारी मरणं अवस्थेत जमिनीवर थर थर कापत तडफडत होता त्याच्या शरीरात जास्त मोठ्या प्रमाणात आळ्या पडलेल्या होत्या शरीरातून खूप दुर्गंध सुटत होता. त्या वृद्धा जवळ कोणी जाण्यास मज्जाव करत नव्हता शेवटी घटनेची माहिती दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनला नागरिकांनी दिली असता सुरजभैय्या यादव हे अवघ्या काही सेकंदात पोहचले आपले सहकारी धर्मेंद्रसिंग चव्हाण यांच्या आटो रिक्शा मध्ये टाकून वृद्ध व्यक्तीस सामान्य रुग्णालयात नेले सर्वप्रथम त्याच्या अंगातील खराब मळकट कपडे काढून फेकले व नंतर गरम पाणी डेटॉल साबुननी त्याला अंघोळ घातली आणि शरीर स्वच्छ करून नवीन टी शर्ट लोवर पेंट आणून नवीन वस्त्र वृद्ध इसमास घालवून दिले. नंतर अतीदक्षता विभाग मध्ये नेले सी. एम. ओ. डॉ. अनंता पेसोडे हे तिथं हजर होते त्यांनी रुग्णावर लगेच उपचार सुरू केले व रुग्णाला अकोला रेफर करावे लागते असा सल्ला दिला बेवारस वृद्ध रुग्णास अकोला न नेता त्याला सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक एक मध्ये भरती करून दिले यावेळी सुरजभैय्या यादव, शुभम क्षिरसागर ,   निलेश झाडोकार , डॉ. अंबादास गावंडे , प्रज्वल झाडोकार , सिद्धेश्वर निर्मळ , विशाल पवार , ध्रुव तोमर , संतोष सोळंके , चेतन सारसर , विकास शेगोकार  आदि लोकांनी या सेवाकाऱ्यात हात लावला वृद्ध रुग्णाची माहिती काढली असता त्याचे नाव ओमकार झापर्डे वय 55 वर्ष राहणार जुनाफैल खामगांव असे कळताच सुरजभैय्या यादव , सिद्धेश्वर निर्मळ हे शिवाजी नगर पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिली सध्या वृद्धावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



Post a Comment

0 Comments