चिखली व मेहकर येथे दिव्यांग बोर्ड सुरु करण्यात यावे, बोर्डावरील डॉक्टरांची नियमीत बदली करत रहावी दिव्यांगशक्ती च्या वतीने मागणी
बुलढाणा (प्रतिनिधी):- संपूर्ण राज्यातील दिव्यांगांचे आपुलकीचे, हक्काचे व्यासपीठ असलेल्या दिव्यांग शक्ती वतीने जिल्हा चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांना दि. ८ रोजी एक निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये
दिव्यांग बांधवांना प्रवासाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे येण्याकरीता मानसिक व आर्थिक त्रास होत आहे, या त्रासातून मुक्तता करण्यात करिता जिल्ह्यात चिखली व मेहकर या ठिकाणी दिव्यांग बोर्ड सुरू करण्यात यावे. तसेच सध्या स्थितीत जे बोर्ड कार्यान्वित केले आहेत त्या बोर्डावरील डॉक्टरांना कायम न ठेवता त्या ठिकाणी वेगवेगळे वैद्यकीय चिकित्सक यांची नियुक्ती देण्यात यावी जेणेकरून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याकडे काम दिल्यामुळे त्याची मक्तेदारी त्या ठिकाणी अस्तित्वात येत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या डॉक्टरांची नियुक्ती त्या बोर्डावर देण्यात यावी. तसेच योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यांत यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली असून निवेदन देतांना दिव्यांगशक्तीचे मनोज नगरनाईक, पद्माकर धुरंधर व मिलींद मधुपवार उपस्थित होते. या निवेदनाची प्रत भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आमदार. विजयराज शिंदे यांना सुध्दा देण्यात आली.
या वर विजयराज शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन आपण केलेली मागणी रास्त असल्यामुळे लगेच हे सोडवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment
0 Comments