*जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ येथील जिगाव पुनर्वसनाच्या प्रश्नावर शेतकऱ्याची स्वातंत्र्यदिनी जलसमाधी*
(राजु पाटील जळगाव जामोद)
जळगाव जामोद तालुक्यातील जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आडोळ खुर्द येथील शेतकरी विनोद पवार यांनी नदीपात्रात उडी घेत जलसमाधी घेतल्याची खळबळजनक घटना घडली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसनाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी अनेक आंदोलने झाली, परंतु प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाच्या वेळी विनोद पवार यांनी नदीत उडी घेतली, मात्र त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही तात्काळ कार्यवाही झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित अभियंत्याला जबर मारहाण केली. या प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.



Post a Comment
0 Comments