Type Here to Get Search Results !

शेगांव तालुक्यातील बेलुरा येथील ३० वर्षीय महिला बेपत्ता

 *


शेगांव तालुक्यातील बेलुरा येथील ३० वर्षीय महिला बेपत्ता*            (राजु घाटे शेगांव)

माटरगांव पासुन १ कीलो मिटर असलेल्या बेलूरा येथून: ३० वर्षीय विवाहित महिला घरून बेपत्ता झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान बेलुरा येथे घडली. जलंब पो. स्टे अंतर्गत येत असलेल्या बेलुरा ता. शेगाव येथील रहिवासी सौ. वंदना सदानंद मोरे वय ३० वर्ष ही विवाहित महिला कोणाला काही न सांगता १३ ऑगस्ट रोजी दुपारी घरून कुठेतरी निघून गेली आहे. सदर महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अशी फिर्याद तिच्या वडिलांनी जलंब पोस्टेला दिली, यावरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पीएसआय सुनिल देव करित आहे.

Post a Comment

0 Comments