*श्रीकृष्ण जन्माष्टमी स्वतंत्र दिवस रक्तदान फळ वाटप करून साजरा*
*दिनांक 15/08/2025*
खामगांव : एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी 79 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी येथील सामान्य रूग्णालयात एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे सकाळी 10:30 ला भव्य रक्तदान शिवीर व रूग्ण आणि रूग्णाच्या नातेवाईकांना केळीचे वाटप गौ -मातेचे पुजन करून फळाचे भोग लावण्यात आले. सर्व प्रथम शासकीय रक्तपेढी मध्ये शहिद विर अमर जवानांना श्रद्धांजली आपला रक्तदान करून दिली रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना केळीचे वाटप करण्यात आले. गौ -मातेला फळाचे भोग लावण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वप्निल दांदळे है होते ही माती सोन्याची हा तिरंगा अभिमानाचा सारे या मिळून करूया रक्तदान सुरजभैय्या यादव यांनी उपस्थित रक्तदात्यांना संबोधीत करून शुभेच्छा दिल्या. या उत्साहात रक्तवीर पुरषोत्तम बोरखडे, नितीन नाळे, शिवम मानकर, गजानन पवार,अजय इंगळे, तुषार इंगळे, ज्ञानेश्वर भोंडे, विकास शेगोकार, चेतन कदम, पवन क्षिरसागर, मुंकिंदा बोंबटकार, किरण बावस्कर, अनिकेत कोरडे, पवन उगले, अमोल मोरखडे, अजय पारस्कर, शेखर रिछारीया, जितेंद्र मच्छरे, गोपाल ईटीवाले, गणेश दही, गोविंदा फाटे, रुपेश कलंत्री, प्रदीप शमी, शिवा दांदळे, अजय निंबाळकर, गोपाल धोटे, गणेश डोबे,एडवोकेट भिवा तायडे, वैभव कापडे, मंगेश धोटे, करण पारधे, अनंता इंगळे, आदित्य आखरे यांच्यासह या उत्साहामध्ये असंख्य रक्तदात्यांची उपस्थिती होती. यावेळी शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख, सौ. चित्रा देशपांडे, सौ. राजश्री पाटील, सुरेंद्र छाजेड, वैभव रेठेकर, दशांक धुरंधर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजु पाटील घाटे, सिद्धेश्वर निर्मळ, रुपेश कलंत्री, ज्ञानेश सेवक सर, सागर बहादरे, परमेश्वर सोळंके, चेतन शेलकर, विठ्ठल लोणाग्रे, शुभम कुंडलवार, नरेश मसनेवार, रविंद्र दिपके, अंकुश अंबूलकार आदि लोकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकिंदा बोंबटकार यांनी केले तर आभार गोपाल ईटीवाले यांनी मानले अशी माहिती सिद्धेश्वर निर्मळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



.jpg)
Post a Comment
0 Comments