आज दि. 15/09/2025 रोजी गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती मोताळा येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून निवेदन सादर
करण्यात आले कि, 2024ते 2025 मंजूरात झालेले घरकुल प्रधानमंत्री, रमाई, शबरी या घरकुलांची वाढीव रक्कम 50,000/- रुपये करण्यात आली असून आतापर्यंत शासनाने एकाही घरकुल लाभार्थीना ही रक्कम देण्यात आलेली नसून ती वाढीव रक्कम लवकरात लवकर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावी, तसेच पहिला हप्ता 15,000/- रुपये देण्यात येतो त्या हप्त्या मध्ये साधा घरकुलाच्या वटयाचे बांधकाम सुध्दा पुर्ण होत नाही याकरिता या हप्त्याची सुध्दा वाढीव करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या
माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देतेवेळी बुलढाणा जिल्हा महासचिव पॅंथर प्रल्हादभाई कोलते, मोताळा शहर अध्यक्ष शेख शफीकभाई, मोताळा तालुका अध्यक्ष भावजी कोलते, ता. संपर्क प्रमुख अक्षय जाधव , ता प्रसिद्ध प्रमुख आकाश सुरडकर, ता सचिव भिमराव गरूडे, शहर कार्याध्यक्ष कैलास खराटे, शहर सल्लागार सावळे, तालुका सदस्य गोपाल प्रधान, ता संघटक कृष्णा गरुडे, ता सरचिटणीस दिपक इंगळे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Post a Comment
0 Comments