निमगाव येथील ज्ञानगंगा नदी पात्रात दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
गजानन डाबेराव
महाराष्ट्र दर्शन न्युज निमगाव
नांदुरा तालुक्यातील निमगाव ज्ञानगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी घडली.
सविस्तर माहिती अशी की, निमगावातील काही मुले नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेली होती. पोहताना पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे गावातीलच दोन मुले नदीपात्रात बुडाली असून त्यांचा शोध वृत्त लिहीपर्यंत लागलेला नाही. सदर मुले ही 18 ते 25 वयोगटातील असल्याचे समजते.सदर घटनेमुळे गावात व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments