*श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव*
*(पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल)*
*श्री संस्थानकडून पुस्ग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखाची मदत*
शेगांव : यावर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झालेले असून अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून राज्यातील पुरामुळे बाधीत झालेल्या पुरपिडीतांसाठी शेगांव श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाचे वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू. १ कोटी ११ लाखाचा सहयोग निधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांना दि.२७/०९/२०२५ रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे.
श्री संस्थेने भरीव मदत देऊन सेवाकार्या सोबतच सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

Post a Comment
0 Comments