Type Here to Get Search Results !

दिनांक-12तारखेला रविवारला मातृशक्ती जागर समितीचा धर्मशस्त्र दीक्षा समारंभ*

 *दिनांक-12तारखेला रविवारला मातृशक्ती जागर समितीचा धर्मशस्त्र दीक्षा समारंभ*




खामगाव- मातृशक्ती जागर समितीच्या वतीने जगदंबा रोड स्थित मोठी देवी जवळ 12 ऑक्टोबर 25 रोजी दुपारी 3 ते 5या वेळेत धर्मशस्त्र दिक्षा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, प्रमुख वक्ते प्रसिध्द शिवव्याख्याते सोपानदादा कनेरकर तर प्रमुख उपस्थिती हिंदुपालक बापुसाहेब करंदीकर यांची राहणार आहे. कार्यक्रमात मुली व महिलांना धर्मशस्त्र (कट्यार ) वितरण

राहणार

आहे. यासाठी 150 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू आहे 

आतापर्यंत 1000 कट्यारसाठी नोंदणी झाली आहे. माता भगनीनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मातृशक्ती जागर समितीच्या अनिता तनपुरे यांनी आज 7 ऑक्टोबर 25रोजी मोठी देवी जवळ आयोजीत पत्रकार परिषदेत केले. यावेळी भाग्यश्री महाजन, कोमल तायडे, सुनिता गुजर, मंगला गुरव, मिनाक्षी अंधारे, पुजा माळवंदे, श्रुती पतंगे, अनुसया पटेल, शिल्पा भदाडे, निता अनोकार, अमृता तायडे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments