Type Here to Get Search Results !

नगर परिषद निवडणूकीत दिव्यांग बांधव अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार?

 नगर परिषद निवडणूकीत दिव्यांग बांधव अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार?


खामगाव (का. प्र.) :- ग्राम पंचायत सरपंच, सदस्य पदाची निवडणूक असो की लोकसभा निवडणूक लढवून खासदार बनण्याची निवडणूक असो कोणत्याही निवडणूकीत देशभरातील कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला उमेदवारी दिली जात नाही. त्या मागे कारणही तसेच आहे. भरपूर फिरावे लागते, जनसंपर्क ठेवावा लागतो, जनतेची कामे करण्याकरीता घराबाहेर पडावे लागते आणि अनेक दिव्यांगांना ते शक्य होत नाही म्हणून त्यांना कोणत्याही निवडणूकीत कोणत्याच पक्षाचे वतीने उमेदवारी


दिली जात नाही.

आणि यामुळेच देशभरातील दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याकरीता सुदृढ व्यक्तींना त्यांना हातपाय जोडावे लागतात, कोणीही त्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यात सहकार्य करीत नाही किंबहुना त्यांना तुच्छ, हिन अशी वागणूक दिली जाते. त्यांच्या दिव्यंगत्वावरून त्यांना हिणविले जाते. परंतु दिव्यांग व्यक्ती म्हणजे केवळ पाय नसलेला आणि चालता येत नाही ही संकल्पना नाही तर जवळपास २१ प्रकारचे दिव्यंगत्व आहे आणि या प्रकारात केवळ जे पायाने अधु आहेत त्यांच्या समोरच चालण्याची समस्या आहे. ज्यांचा हात अधु आहे, अंध आहेत, मुक आहेत असेही अनेक दिव्यांग बांधव आहेत जे निवडणूक लढवू शकतात.


भारताच्या इतिहासात आजपर्यंत एकाच गावात प्रत्येक वॉर्डत दिव्यांग व्यक्ती निवडणूकीला उभे आहेत असे कधीही झाले नाही पण यंदा ते खामगांवात होणार आहे.

 आज रोजी देशातील अनेक शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये आयएएस पासून ते इतर श्रेणीमध्ये दिव्यांग आरक्षण असल्यामुळे कार्यरत आहेत 

परंतु राजकीय पक्ष कडून निवडणुकी मध्ये दिव्यांग आरक्षण करिता चकार शब्दही फुटेना फक्त निवडणुकी दरम्यान स्वीकृत सदस्याचे आमिष देऊन त्यांची बोलवण करीत असतात

याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहे

विराट मल्टीपर्पज फाऊंडेशन हि दिव्यांगांकरीता कार्यरत असलेली संस्था असून सा. दिव्यांग शक्ती हे दिव्यांगांचे हक्काचे व्यासपीठ आहे. त्या माध्यमातून विराट मल्टीपर्पज फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मनोज नगरनाईक हे येत्या खामगांव नगर परिषदेच्या निवडणूकीत सर्व प्रभागातून अपक्ष म्हणून दिव्यांग व्यक्तींना उमेदवारी देवून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणार आहेत. आजपर्यंत अगदी बोटावर मोजण्या एवढे दिव्यांग लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. पण दिव्यांग देखील काहीतरी करू शकतात आणि ते सुध्दा समाजातील एक घटकच आहेत, त्यांनाही निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आहे ही भावना लक्षात घेवून संपुर्ण देशातील पहिलाच प्रयोग खामगांवात होणार आहे. एकही दिव्यांग बांधव निवडून आला नाही तरीही चालेल पण त्यांची दिव्यांग शक्ती या निवडणुकीतून दिसून येईल.

तरी खामगांव नगर परिषद निवडणूकीत ज्या दिव्यांग बांधवांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी मनोज नगरनाईक, संस्थापक अध्यक्ष विराट मल्टीपर्पज फाऊंडेशन तथा मुख्य संपादक सा. दिव्यांग शक्ती यांच्या सोबत संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments