*तारापूर शिवारात सहा फूट लांब दुर्मिळ अजगर सापाचा मृत्यू*
*वन्यजीव संरक्षण मोहिमेचा बट्टा बोळ*
*मोताळा*(शेख अफसर) तालुक्यातील तारापूर हे गाव अंबादेवी संस्थान तसेच पलढग (ड्याम) धरण डोंगराळ दर्या प्राण्यांचे अधिवास व निसर्गरम्य देखावा यामुळे तालुक्यासह पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे
विशेष म्हणजे सदर गावाला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमा आहे
त्यामुळे अनेक वेळा अभयारण्यातील जलचर व सस्तन व हिस्त्र प्राणी गावात येण्याच्या घटना घडतात त्यात प्राप्त माहितीनुसार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी तारापूर शिवारात असलेल्या नदीपात्रात मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अटकून अजगर जातीच्या सापाचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे वन्यजीव संरक्षण मोहिमेअंतर्गत सुरक्षण प्राप्त असलेल्या सस्तन व जलचर प्राण्यांचा मृत्यू होणे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर व संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नव्हे तो मित्र आहे कारण अन्नसाखळी प्रक्रियेत अजगरसारखे दुर्मिळ साप पर्यावरणातील कीटक नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तो उंदीर घुशी ससे यासारख्या शेतातील कीड प्राण्याचा भक्षक आहे अन्नसाखळी प्रक्रियेत अजगर हा मध्यम शिकारी आहे उंदरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होते उंदिरणी शेतात खोदलेल्या बिळामुळे माती सेल होते पण अजगर त्यांना नियंत्रण करून पिकांच्या मुळाना संरक्षण देतो म्हणून अजगर हा निसर्ग रक्षक व शेतकऱ्याचा मित्र आहे त्याला वाचण्यासाठी वनविभागाने योग्य ती मोहीम व शिबिरांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे

Post a Comment
0 Comments