Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्ह्यात छोट्या-मोठ्या पक्षांची बैठक पर्यायी आघाडीचा बिगुल!

 बुलढाणा जिल्ह्यात छोट्या-मोठ्या पक्षांची बै




ठक पर्यायी आघाडीचा बिगुल!


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीतून मोठ्या ताकदीने लढवू.. - सुजित बांगर


आज दि.10 नोव्हेंबर रोजी खामगाव येथील आदर्श हॉटेल मध्ये विविध पक्ष संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.


चौकट:-

बुलढाणा जिल्हात नव्या शक्तीचा जन्म छोटी-मोठी मिळून तिसरी भक्कम आघाडी तयार! 

पारंपारिक राजकारणाला धक्का १५+ संघटना एका मंचावर! अजूनही समविचारी पक्ष संघटनांशी चर्चा चालूच आहे.

बुलढाणा जिल्हा बदलाच्या उंबरठ्यावर विविध पक्ष,संघटना आता एकाच दिशेत! असे प्रतिपादन बैठकीत अध्यक्षीय भाषनातून संबोधित करतांना सुजित बांगर यांनी केले आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत अशातच आज खामगाव येथील आदर्श हॉटेल वर संपन्न झालेल्या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांची तिसरी आघाडी निर्माण झाल्याने जिल्ह्यातील राजकारणात ओढाताण होतांना दिसून येत आहे.समोरील काही दिवसांवर नगरपंचायत,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. 

सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या पदरात पडणाऱ्या जागा जर आपल्या पदरात घ्यायच्या असतील तर त्यासाठी एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही असा सुर या बैठकीतून निघाला आहे. या बैठकीत मायनॉरिटी डेमिक्रोटिक पार्टी इंडीया,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी,ऑल इंडिया पँथर सेना, आझाद समाज पार्टी,रिपब्लीकन सेना,समाज क्रांति आघाडी,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), राष्ट्रीय किसान सभा,भीम आर्मी-भारत एकता मिशन,बहुजन मुक्ती पार्टी, दिव्यांग क्रांति आघाड़ी यांचेसह अनेक समविचारी पक्ष संघटनांना सोबत घेऊन खामगाव येथील आदर्श हॉटेल मध्ये सुजित बांगर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांची एक वज्रमुठ बांधून एक मजबूत तिसरी आघाडी बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. वरील सर्वच पक्ष संघटनांची नेते पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत वरील सर्व पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी आप-आपल्या पक्ष संघटनांची भूमिका आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केली व सर्वानुमते ही आघाडी निर्माण झाली. यावेळी विविध पक्ष संघटनांचे प्रमुख प्रतीनिधि स्वरूपात उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन विजय इंगळे तर ही महत्वपूर्ण बैठक घडवून आणण्यासाठी सुजित बांगर, सागर मोरे यांनी प्रयत्न केले होते.

Post a Comment

0 Comments