*खामगांव कु उ बा चे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित*
(खामगाव प्रतिनिधी
)
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात १४ नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव पारित झाला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या अधिपत्याखाली असलेली एकमेव संस्था देखिल हातची गेली आहे. दिलीप सानंदा यांना मोठा धक्का मानला जात आहे. नगर पालिका निवडणुका काळात घडलेल्या या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे हे गेल्या काही दिवसांपासून मनमानी
कारभार करत होते. माजी आमदार दिलीप सानंदा यांची बाजार समितीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर ढवळा ढवळ सुरू होती. संचालकांना विश्वासात न घेता सभापती पेसोडे निर्णय घेत होते. यामुळे संचालकांमध्ये पेसोडे यांच्याबाबत असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सभापती पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावर मतदान घेण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या टीएमसी यार्डमध्ये विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेच्या पार्श्वभूमीवर टीएमसी
यार्डमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली. या सभेला १८ पैकी १३. संचालक उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने १२ संचालकांनी मतदान केले तर केवळ सुभाष पेसोडे यांनी विरुद्ध मतदान केले. त्यामुळे पेसोडे यांच्या विरोधातील हा अविश्वास ठराव १२ विरुद्ध १ अशा मतांनी पारित झाला.
यामुळे खामगांव कु उ बा चे सभापती सुभाष पेसोडे हे बाजार समिती सभापती पदावरून पायउतार झाले. माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे.

Post a Comment
0 Comments