Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनी* *उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांच्या हस्ते* *ध्वजारोहण*

 **प्रजासत्ताक दिनी*  *उपविभागीय अधि







कारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांच्या हस्ते* *ध्वजारोहण*  




 खामगाव  दि. 26 (उमाका): आज 26 जानेवारी 2026 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  उत्साहात पार पडला खामगाव येथील उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुष्ठरोग नियंत्रण व इतर विषयावर सामूहिक शपथ घेण्यात आली. राष्ट्रगीत महाराष्ट्र गान ने प्रजासत्ताक सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या आपले कर्तब दाखविले आयोजित समारंभ खामगाव विधानसभेचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा नानाभाऊ कोकरे नगराध्यक्ष सौ अर्पणाताई सागर फुंडकर डी वाय एस पी प्रदीप पाटील तहसिलदार सुनिल पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह नगर सेवक व स्वातंत्र्य सैनिक तथा महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते आयोजित समारंभ जे व्ही मेहता विद्यालयातील विविध स्पर्धेत क्रीडा क्षेत्रात राज्य व विभागीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या असते गौरविण्यात आले . ज्यामध्ये अभय संतोष कुंदाराम गौरव संतोष नगरे कुमारी प्रिया प्रदीप हरमकार पवन अनिल बाभुळकर कृशा रवी नाटेकर सार्थक संतोष राठोड स्नेहा उमेश जाधव व महक दत्तात्रय सुलताने या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.   तसेच एनसीसी चे अंबादास नागरगोजे यांनी माउंट एवरेस्ट शिखर मध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आर्मी अटॅचमेंट कॅम्प पुणे येथे गोल्ड मेडल प्राप्त करणारे सुहास बेडेकर सिल्वर मेडल प्राप्त करणारे पवन ठाकरे कुमार किरण पडघन दिल्ली परेड मध्ये सहभागी होणारे मोहम्मद जावेद तिरुपती ट्रेनिंग कॅम्प मध्ये गोल्ड मेडल मिळवणारे भागवत काळे तसेच स्वच्छता अभियानात बुलढाणा जिल्ह्यातून प्राविण्य मिळवणारे राजू हिवाळे या अधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी केला उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 



Post a Comment

0 Comments