कायदयाचे पालनहार की वर्दीमधील गुंड ?
सामान्य नागरिकांस पोलीस स्टेशनमध्ये मारहाण
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा पोलीस स्टेशन मधील गुंड प्रवृत्तीचे पोलीस अधिकारी सामान्य माणसाची तक्रार घेत नाही हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा घेत नाही कोणत्याही कार्यालयामध्ये सामान्य माणसाला व्हिडिओ शूटिंग काढता येतो. याबाबतचा शासन जीआर सुद्धा आहे बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा आपल्या एका निर्णयांमध्ये कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये व्हिडिओ शूटिंग काढता येतो. तरी हे गुंड प्रवुक्तीचे पोलीस अधिकारी जनतेवर अत्याचार करतात तक्रार घेत नाही मोबाईल हिसकावून घेतात असाच एक प्रकार नांदुरा शहरांमध्ये आज दि. 27/01/2026 रोजी घडला नांदुरा शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेत नसल्यामुळे त्यांनी शूटिंग काढण्यात सुरुवात केली तेथील गुंड प्रवुक्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व पोलीस स्टेशनमध्ये दोन तास जबरदस्ती बसून ठेवले व प्रकरण अंगलट येईल म्हणून सोडून दिले असता तक्रारदार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्याकडे धाव घेवून तक्रार दाखल केली यावरून अप्पर पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले

Post a Comment
0 Comments