Type Here to Get Search Results !

खुमगाव ता. नांदुरा येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे मान्यवराच्या हस्ते उदघाटन

 खुमगाव ता. नांदुरा येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे 

मान्यवराच्या हस्ते उदघाटन



प्रतिनिधी अरुण सुरवाडे 

खुमगांव (ता. नांदुरा) येथील — स्व. देवीदासभाऊ सातव आणि स्व. कैलासभाऊ इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री देवधरी क्रीडा मंडळ, खुमगांव यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ५५ किलो वजन गट तसेच ३ ओपन वजन गट अशा दोन गटांत सामने रंगणार आहेत.

ही स्पर्धा जि. प. क. मराठी उच्च प्राथमिक शाळा, खुमगांव येथे पार पडणार असून जिल्हा व परिसरातील नामांकित कबड्डी संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसे व चषक ठेवण्यात आले आहेत.

या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मलकापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री चैनसूख संचेती यांचे सुपुत्र यश संचेती. नांदुरा नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर भाऊ मुरेकर.प्रमोद हिवाळे. प्रमोद खोंड यांचेसह खुमगांव सरपंच विष्णूभाऊ वावगे या मान्यवरांचे हस्ते उदघाट्न करून सामन्याला सुरवात करण्यात आली, यावेळी स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पंच, समालोचक व व्यवस्थापन समितीची विशेष तयारी करण्यात आली .

या सामन्याचे लॉट्स रात्री 12 वाजता पाडण्यात येतील

कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

0 Comments