Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत प्रशासकपदी पत्रकारांची* *नेमणूक करावी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

 *ग्रामपंचायत प्रशासकपदी पत्रकारांची* *नेमणूक करावी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

: फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ संपणार आहे. तेव्हा ग्रामपंचायत मध्ये विद्यमान



सचिव यांना प्रशासक न नेमता त्या- त्या गावातील पत्रकारांची नेमणूक करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पाठविले आहे. २०२६ होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता कुठलाही कार्यक्रम प्रशासनाने अध्याप जाहीर केलेला नाही. विद्यमान सरपंचांना प्रशासक नियुक्त केल्यास पुढील होणारी निवडणूक प्रभावी होऊ शकते याकरीता पत्रकारितेत १५ वर्ष अनुभव असलेल्या पत्रकारांची नेमणूक केल्यास थोडे दिवस का होईना ग्रामपंचायत च्या विकासाला हातभार लागणार आहे. प्रत्येक वेळेस राजकीय पक्ष पत्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे या मागणीची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी दखल घ्यावी. अशी मागणी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान पठाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, सुरेश सवळे अध्यक्ष नियोजन समिती, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना इमेल ने पाठवलेल्या निवेदनात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments