Type Here to Get Search Results !

सज्ज पुन्हा शिवसेना,भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.!

  १७ जानेवारी २०२६ खामगांव!


सज्ज पुन्हा शिवसेना,भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.!



आज खामगांव शहरातील श्रीहरी लाॅन्स येथे हिंदूसेवक ॲड मा.श्री.अमोलभाऊ अंधारे यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर प्रथमच खामगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भव्य पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या उपस्थिती मध्ये अकोला येथील जाहीर सभेमध्ये हिंदूसेवक ॲड मा.श्री.अमोलभाऊ अंधारे यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश संपन्न झाला.


आज हिंदूसेवक ॲड मा.श्री. अमोलभाऊ अंधारे यांच्या हजारों सहकाऱ्यांनी शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.


शिवसेना मुख्यनेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे आज जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळत आहे. याची प्रचिती आपल्या सर्वांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी वेळी आली. मात्र आताची निवडणूक ही तुमची, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आपल्या संघटनेच्या आणि शिवसैनिकाच्या विजयासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.


शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांची संघटना आहे. इथे सर्वांत मोठा कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे.सध्या बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेला पोषक वातावरण आहे.


आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे. त्यामुळे घराघरात शिवसेना पोहोचली पाहिजे आणि हा जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनामय झाला पाहिजे, हेच प्रत्येक पदाधिकाऱ्याचे ध्येय असले पाहिजे.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संतोष डिवरे,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ जाधव,बुलढाणा न.प.गटनेते श्री.कुणाल गायकवाड,शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.संजय अवताडे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शारदाताई पाटील,युवासेना लोकसभा अध्यक्ष श्री.चेतन पाटील घिवे,यांच्यासह खामगांव मतदारसंघातील शिवसेना, युवासेना महिला आघाडी पदाधिकारी,शिवसैनिक,कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments