*
काटी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रतिक्षाची BSF तर सागरची CRPF मध्ये निवड*
अरुण सुरवाडे
*प्रतिनिधी :* नांदुरा तालुक्यातील काटी येथील कु. प्रतिक्षा पद्माकर हिवाळे व सागर रतनसिंग राठोड यांनी SSC GD परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गावासह तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. कु. प्रतिक्षा पद्माकर हिवाळे हिची सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये नियुक्ती झाली. असून सागर रतनसिंग राठोड यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली आहे.
कु. प्रतिक्षा हिने कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले असून ती तालुक्यातून BSF मध्ये निवड होणारी पहिली महिला सैनिक ठरली आहे. तिच्या या यशामुळे महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले असून अनेक तरुणींना ती प्रेरणादायी ठरणार आहे.
सागर राठोड यांनीही सातत्यपूर्ण अभ्यास व मेहनतीच्या जोरावर CRPF मध्ये स्थान मिळवत कुटुंबासह गावाचा अभिमान वाढवला आहे.
या दोघांच्या निवडीमुळे काटी गावात व परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोघांच्या पुढील देशसेवेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत असून त्यांच्या यशामुळे आगामी पिढीसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments