Type Here to Get Search Results !

दिव्यांग 5% निधी वाटप करण्यात यावे यासाठी विराट मल्टिपर्पज फाउंडेशन च्यावतीने निवेदन

 दिव्यांग 5% निधी वाटप करण्यात यावे यासाठी विराट मल्टिपर्पज फाउंडेशन च्यावतीने निवेदन




खामगाव

ग्रामपंचायत स्तरावर अभय योजना अंतर्गत कर वसुली चांगली झाली आहे या मधून दिव्यांग हक्कासाठी असलेला 5% निधी वितरीत करण्यात यावे या करिता विराट मल्टिपर्पज फाउंडेशन खामगाव या दिव्यांग संस्थेच्या वतीने 

 मुख्य कार्यकारी अधिकारी जि प बुलढाणा  गट विकास अधिकारी पंचायत समिती खामगाव जिल्हा बुलडाणा यांना देण्यात आले 

खामगाव येथे 

 गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांनी निवेदन स्वीकारले

 जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यक्षेत्रातील ग्राम पंचायत मध्ये दिव्यांग नोंदी उपलब्ध आहे त्यांना शासन ग्रामविकास परिपत्रक नुसार ५% अर्थ सहाय्य प्रदान करण्यात बहुतांश ग्राम पंचायती प्रत्येक वर्षी टाळाटाळ करत असतात नेहमी वसुली न झाल्याचे कारण देत  कर्मचारी अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रकार करीत असतात त्यांना एक नियमावली आखून देण्यात यावी

 सध्या शासनाने ५०% कर सवलत साठी अभय योजना नुसार वसुली सुरु आहे त्यात भरघोस प्रतिसाद पाहता ५% दिव्यांग स्वनिधी चे वाटप मागील काळातील थकीत व चालू वर्षचे वाटप येत्या २६ जानेवारी २०२६ गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा त्याच दिवशी वाटप करण्याचे आदेश देत त्यासाठी आपण जातीने लक्ष घालून हे वितरण करण्यात पावे

तसेच

 २) घरकुल मध्ये सुध्दा प्रथम लाभार्थी म्हणून निवड करण्यात यावी 

३) काही ग्राम पंचायत ५०% कर सूट दिव्यांग व त्यांच्या कुटुंबाला सवलत देत नाही ती देण्यात यावी 

अश्या मागणीच्या निवेदनाची दखल घेत कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी विराट मल्टिपर्पज फाउंडेशन संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक प्रहार शहराध्यक्ष 

शत्रुघ्न इंगळे,मो.राईस,बापू नाना दामोदर,उमेश देशमुख,विलास चतृभुज शेखर तायडे आदी यावेळी उपस्थित होते 



मा.संपादक वार्ताहर आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्रात प्रसिध्दी देण्याची कृपा करावी 

Post a Comment

0 Comments