Type Here to Get Search Results !

तेलंगाना मध्ये एकनिष्ठा फाउंडेशन रक्तवीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 नी सम्मानीत*



*तेलंगाना मध्ये एकनिष्ठा फाउंडेशन रक्तवीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 नी सम्मानीत*






*दिनांक 21/01/2026*

खामगांव :- दिनांक 18/01/2026 रोजी सकाळी 9 वाजता जिंदगी फाउंडेशन व थैलीसिमिया सिकलसेल सोसायटी बंकटलाल भवन यांच्या संयुक्त विद्यमाने पुलिस अकॅडमी राघवेंद्र कालीन शिवराम पल्ली तेलंगाना येथे राष्ट्रीय सम्मान सोहळा व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम सुरजभैय्या यादव, प्रदीप शमी, चेतन कदम, अकील खान, ब्रजेश सिंग यांनी थैलीसिमिया मेजर आजार ग्रस्त पिडीत रुग्णासाठी रक्तदान केले. या सम्मान सोहळ्यात व तसेच रक्तदान शिबिरात महाराष्ट्र राज्यातून खामगांव बुलढाणा जिल्ह्यातील नामांकीत संस्था एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या रक्तविरांसह देश विदेशातून आलेल्या 389 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन थैलीसिमिया सिकलसेल रुग्णांसाठी स्वयंफुर्तीने रक्तदान केले. हा रक्तसाठा रुग्णांना नि:शुल्क देण्यात येणार आहे  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कारगिल युद्ध नायक आपले दोन्ही पाय व उजवा हात भारत देशाच्या रक्षणार्थ सिमेंवर दुश्मनाशी लढतांनी कारगिल युद्धात गमावलेले खरे नायक मा. श्री.दिप चंद यांच्यासह श्रीमती झान्सी चिंथकायला , समाजसेवी प्रेम कच्छावा, कैलास प्रजापती आदि मान्यवरांनी मागील तेरा वर्षा पासून निरंतर योगदान देत निःस्वार्थ सेवा करत असलेल्या एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव, सल्लागार अजय वेरूळकर , शहराध्यक्ष प्रदीप शमी, शहर सचिव चेतन कदम, सदस्य अकील खान यांना रक्तवीर स्मृती चिन्ह प्रमाणपत्र दुपट्टा राष्ट्रीय रक्तवीर पुरस्कार देऊन सम्मानीत केले व तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या एकनिष्ठा फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती धनंजय गौतमारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.


Post a Comment

0 Comments