Type Here to Get Search Results !

शिवशंभू आखाडा रोहिणखेडचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

 शिवशंभू आखाडा रोहिणखेडचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश


     (रोहीनखेड प्रतीनिधी)                                                                               पवनी (जि. भंडारा) येथे दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय अस्टेडू आखाडा शिवकालीन मर्दानी खेळ स्पर्धेत शिवशंभू आखाडा, रोहिणखेडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य व पाच कास्य अशी एकूण आठ पदके मिळवण्यात आली.

रेणुका विजय गुजर हिने सुवर्णपदक पटकावले. विशाल गंगाराम सोळंके व यश सुभाष इंगळे यांनी रौप्यपदके मिळवली. गणेश संदीप भुसारी, वेदिका देविदास सपकाळ, प्रगती शांताराम राजस, वेदांती प्रकाश गलबले व आदिती प्रकाश गलबले यांनी कास्यपदके पटकावली.

शिवशंभू आखाड्याची स्थापना 2023 मध्ये संभाजी शिवाजी हाडे यांनी केली असून मुख्य प्रशिक्षक संभाजी हाडे, तसेच प्रगती राजनकर व सचिन राजनकर हे प्रशिक्षण देत आहेत. “बल हेच जीवन” हा आखाड्याचा ध्येयमंत्र आहे.

Post a Comment

0 Comments