धुळ्यात लाचखोर अधिकाऱ्यांची साखळीच ‘एसीबी’च्या तावडीत! ३० हजारांच्या लाचेने संपवलं करिअर…
धुळे जिल्ह्यात एकाचवेळी नगररचना विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तिघे अधिकारी–कर्मचारी लाच प्रकरणात अडकल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन बिनशेती मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तिघांना रंगेहाथ अटक केली आहे.
या कारवाईत धुळे नगररचना विभागातील सहाय्यक रचनाकार कल्पेश धनलाल मोरे (वय २८, वर्ग–२), सहाय्यक आरेखक किशोर भटा भोई (वय ४३, वर्ग–३) तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक आनंद हटकर (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments