Type Here to Get Search Results !

माटरगांव बु येथे यशस्वी सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न

 

माटरगांव बु येथे यशस्वी सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न

माटरगांव बु येथे 24 जानेवारी 2026 शनिवार रोजी आरोग्य उपकेंद्र व भरारी महिला ग्राम संघ माटरगाव बु यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वज्ञ ज्ञानपीठ मध्ये मोफत सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले . सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर आरोग्य केंद्रातील श्री पुष्पक देवकाते व  आशिष लोखंडे यांनी सिकलसेल आजार त्याची लक्षणे व उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले . या शिबिरामध्ये एकूण 80 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सिकलसेल पेशींचा आकार विळ्यासारखा झाल्यामुळे होणाऱ्या वेदना व काळजी कशी घ्यावी याबाबत लोखंडे सरांनी मार्गदर्शन केले सिकलसेल आजाराची वेळीच तपासणी केल्यास पुढील पिढीतील संसर्ग टाळता येऊ शकतो असे आवाहन डॉक्टर्सनी केले 

यावेळी भरारी ग्राम संघाचे अध्यक्ष उर्मिला  ताई रोठे ग्रामसखी ज्योतीताई जगताप रुक्मिणी नागपुरे आशाताई मंदा भगत , आशा मोरे सुनीता फुटवाईक , संगीता वानखडे , रंजना सोनवणे उपस्थित होत्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग व भरारी ग्राम संघाने सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments