ग्राम जनुना येथील सर्पमित्र मृतक मंगेश कांबळेच्या मृत्यूस जबाबदार असल्याची
रुग्णवाहिका चालकाविरुद्ध भावाची पोलीसात तक्रार
.
खामगाव (प्रतिनिधी):-
जनुना येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांनी गावातच
निघालेला कोब्रा साप पकडून
त्याला जंगल भागात सोडून देत
असतांना अचानक सापाने
मंगेश याला चावा घेतला
असता मंगेश याला
उपचारासाठी प्रथम सामान्य
रुग्णालय येथे आणण्यात आले.
पुढील उपचारासाठी मंगेश ला
अकोला येथे पाठविण्यासाठी
शासकीय रुग्णवाहीका शोधली
असता उपलब्ध नसल्याने एका
खाजगी रुग्णवाहीका बोलवून
मंगेश ला अकोला रवाना
करण्यात आले. रुग्णवाहीका
चालकाने सुरवातीला दोन
हजार रुपये लागतील असे
नातेवाईकांना सांगितले असता
त्यातील एकाने अठराशे रुपये दिल असे सांगितल्यावर ॲम्बुलन्स चालकांनी ॲम्बुलन्स अकोला रोडने रवाना केली. टेंभुर्णा
गावाजवळील असलेल्या पेट्रोल
पंपावर चालकाने डिझल
टाकण्यासाठी पैसे मागितले
मंगेश च्या मित्राच्या जवळ फक्त
सातशे रुपये निघाले त्याने ते
चालकाच्या जवळ दिले असता
मला संपूर्ण पैसे इथेच द्या
अन्यथा मी रुग्णवाहीका परत
खामगाव ला घेऊन जाईल असे
म्हटले. सोबत असलेल्या
सगळ्यांनी अकोला येथे
पोहचल्या बरोबरच तुम्हाला
उरलेले पैसे देतो म्हणून सुद्धा वणवणी केली. तरीही
चालक काहीच ऐकायच्या
तयारीत नव्हता.
पूर्ण पैसे नसल्याने चालकाने
सदर ची रुग्णवाहीका परत
खामगाव सामान्य रुग्णालयात आणली व रुग्णाला सामान्य रुग्णालयात सोडून
निघून गेला. मंगेश याला
तात्काळ पुढील उपचार मिळाले
असते तर मंगेश वाचला जीव असता
असा आरोप मंगेश चा भाऊ सुनील याने पोलीस स्टेशनला
दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.
त्यातूनच सदर चा प्रकार घडला
मंगेश ला पुढील उपचार जर वेळेवर मिळाला असता तर कदाचित मंगेश आज जिवंत असता. मंगेश सर्वसामान्य
नागरिकांसाठी जीव धोक्यात
घालून काम करत असल्याची
कल्पना डोक्यात ठेऊन तरीही रुग्णवाहीका चालकाने अकोला येथील सामान्य रुग्णालयात पोहोचविणे गरजेचे होते. परंतु ॲम्बुलन्स चालकाने कोणताच विचार न करता मंगेश कांबळे यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत चालक का विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलीस आणि सामान्य रुग्णालय प्रशासन काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments