महिला दिन साजरा करण्यात आला विविध कार्यक्रमांचे आयोजन
माटरगाव बु येथे भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत गीत झाले प्रमुख पाहुणे माजी सरपंच निखाडे ताई राधिकाताई टिकार तसेच उज्वलाताई मिरगे समाजसेविका मंगलाताई सपकाळ व इतर मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन ग्राम संघाचे अध्यक्ष उर्मिलाताई रोठे यांनी सत्कार केला तसेच ज्येष्ठ महिला म्हणून देवकाकाकू गाडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी लिंग समानता महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत प्रमुख पाहुणे समाजसेविका मंगलाताई सपकाळ यांनी महिला सबलीकरण बद्दल आपले मत व्यक्त केले महिलांनी फक्त चूल आणि मूल या पुरते मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक चळवळीत भाग घेतला पाहिजे स्वतःचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी समूह व ग्राम संघामध्ये संघटित राहून कार्य करणे गरजेचे आहे अशी माहिती दिली उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या समूहातील महिलांचे सत्कार करण्यात आले महिलांचा केवळ महिला दिनापुरता आदर न करता प्रत्येक पुरुषाने स्त्रीला बरोबरीची व समानतेची वागणूक दिल्यास सुख समाधान नांदण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन उर्मिला रोठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले जेंडर इक्वलिटी ची शपथ घेण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतीताई जगताप तर आभार सुनीताताई नागपुरे यांनी केले यावेळी सर्व पदाधिकारी कॅडर ताई समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या




Post a Comment
0 Comments