Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ फाऊंडेशन अमरावती तर्फे पार पडला भव्य शिवजन्मोत्सव सोहळा* *स्वराज्याचा सुवर्णक्षण या अनोख्या नाट्यप्रयोगाने अमरावतीकर मंत्रमुग्ध*

 *राजमाता जिजाऊ फाऊंडेशन अमरावती तर्फे पार पडला भव्य शिवजन्मोत्सव सोहळा*

 *स्वराज्याचा सुवर्णक्षण या अनोख्या  नाट्यप्रयोगाने अमरावतीकर मंत्रमुग्ध*


     स्थानिक अमरावती गाडगे नगर येथील राजमाता जिजाऊ फाउंडेशन म्हणजेच आर जे मित्रपरिवार तर्फे भव्य व आगळावेगळा असा शिवजन्मोत्सव सोहळा काल संत गाडगेबाबा मंदिर प्रांगण येथे पार पडला. नेहमी आगळ्यावेगळ्या व अभिनव कार्यक्रमाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा याही वर्षी अखंडित राहिली. यावर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्वराज्याचा सुवर्णक्षण या संगीतमय महानाट्याने अमरावतीकर मंत्रमुग्ध झाले.

        कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई भवानी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने झाली.

       कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती मतदारसंघातील लोकप्रिय आमदार मा. सौ सुलभाताई खोडके तसेच विधानपरिषद आमदार मा. श्री संजयजी खोडके साहेब तसेच युवा नेतृत्व मा. श्री यश दादा खोडके यांच्यासोबतच नवनिर्वाचित नगरसेवक मा. श्री प्रमोद दादा महल्ले, मा. श्री. चंदू भाऊ खेडकर  मा. सौं. मीनलताई सवई व मा. श्री.  ऋषिकेश भाऊ देशमुख यांच्या सोबतच अमरावती मधील सुप्रसिद्ध पारिजात हॉस्पिटल चे संचालक डॉ भूपेश भोंड व चाणक्य अकॅडेमी चे संचालक श्री मिलिंद लाहे यांची उपस्थिती लाभली होती. 

         आर जे मित्रपरिवार तर्फे नेहमी प्रमाणे या वर्षी सुद्धा 'अमरावती भूषण' पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अमरावती शहरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, व कलाक्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी आरोग्य क्षेत्रातील 'अमरावती भूषण' पुरस्कार, नामवंत व ख्यातनाम बालरोगतज्ञ् डॉक्टर श्री हेमंत मुरके सर यांना देण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात  यंदाचा पुरस्कार हा नेमबाजी ह्या खेळातील उत्कृष्ट खेळाडू श्री समर्थ मारोटकर तसेच वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग अथेलेटे या खेळ प्रकारामध्ये गोल्ड मॅडलिस्ट कु. स्वाती गाडे यांना देण्यात आला. तसेच कला क्षेत्रातील यंदाचा अमरावती भूषण पुरस्कार हा 'मराठी बिग बॉस फेम' श्री रोशन भजनकर यांना देण्यात आला.

    

       यावर्षी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीतमय महानाट्य 'स्वराज्याचा सुवर्णक्षण'.  तब्बल १०० कलाकारांमार्फत सादर करण्यात आलेले हे महानाट्य म्हणजे जणू काही आपल्या डोळ्यासमोर शिवसृष्टीच उभी करण्यात आली होती असे भासत होते. अंगावर शहारे आणणारे रोमांचक क्षण डोळ्या देखत उभे करण्यात आले.  यावेळी सुंदर अशी प्रकाश व्यवस्था तशीच ध्वनी व्यवस्थेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच भव्य आतिषबाजीने या कार्यक्रमाला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले.

       या ऐतिहासिक व पारंपारिक भव्य दिव्य अशा शिवजन्मोत्सव सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता परिसरातील नागरिकांची तोबा गर्दी होती.

        कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आर जे मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भूषण इंगळकर, संस्थापक उपाध्यक्ष अभिजीत भिवापुरे, कोषाध्यक्ष कुणाल यावलीकर, सचिव विपुल इंगोले तसेच कार्यकारी सदस्य यश निस्ताने, आशुतोष पानसरे, भावेश सूर्यवंशी, सागर पिसोळे, रोशन मते, प्रतीक मंडलिक, आयुष जामोदकर, प्रितेश ठाकूर, शुभम राठोड, प्रज्वल बावस्कर, ऋत्विक लोखंडे, दीप महल्ले, शिवा महाजन, तन्मय मोहोळ, पुष्पक राठी, जयेश यादव, पार्थ आगरकर, निरांत निशाणदार, अथर्व फुसे गणेश जोशी व समस्त राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज फाउंडेशनच्या  सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments