Type Here to Get Search Results !

मान्यवर कांशीराम यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त ९ राज्यांमध्ये कार्यक्रम बसपा आपली राजकीय ताकद दाखवणार

 मान्यवर कांशीराम यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त 

९ राज्यांमध्ये कार्यक्रम

बसपा आपली राजकीय ताकद दाखवणार



प्रतिनिधी अरुण सुरवाडे 

. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च रोजी उत्तर प्रदेशसह नऊ राज्यांमध्ये बसपा आपली ताकद दाखवणार आहे. याबाबत सुश्री.बहन मायावतीजी यांनी पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. ९२ व्या जयंतीनिमित्त विदर्भातील वर्धा येथे समर्थक गोळा होतील अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, पक्ष हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, बंगाल, पंजाब आणि केरळ यासारख्या राज्यांमध्येही कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


जयंती कार्यक्रमनिमित्त राज्यात निरीक्षकाची नियुक्ती


सुश्री मायावती यांनी या सभेच्या यशाची खात्री करण्यासाठी  पक्षअधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे समन्वयक रणधीर सिंग बेनीवाल यांना हरयाणा आणि पंजाबमध्ये, रामजी गौतम यांना महाराष्ट्रात, अत्तर सिंग यांना तेलंगणामध्ये आणि राजाराम यांना मध्य प्रदेशात लोकांना एकत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.

विदर्भातील वर्धा येथे मान्यवर काशीराम यांच्या जयंती निमित्त सम्पूर्ण महाराष्ट्र मधून हजारोच्या संख्येने बसपा कार्यकर्ते समर्थक पदाधिकारी जमा होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस. भाजपासह अन्य राजकीय पक्षामध्ये खळबळ हजारोच्या संख्येने बसपा मध्ये प्रवेश करण्याची शक्यता.

Post a Comment

0 Comments