अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी जगदीश बुलबुले यांची नियुक्ती
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र संपूर्ण भारत या पत्रकारांच्या समस्या अडचणीसाठी सदैव लढणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी जगदीश बुलबुले यांची फेर निवड करण्यात आली. जगदीश बुलबुले यांनी मागील अनेक वर्षापासून संघटने सोबत एकनिष्ठ राहून केलेल्या कामाचे फळ त्यांना मिळाले आहे. जगदीश बुलबुले यांनी सदरील संघटनेत जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजी नगर,जिल्हा संपर्कप्रमुख यानंतर मागील वर्षी मराठवाडा विभागीय अध्यक्ष त्यानंतर परत एकदा त्याची मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सदरील नियुक्ती
केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेशराव सवळे, केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, चिटणीस अशोकराव पवार, केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिप जोशी, प्रा. रविंद्र मेंढे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, अभिमन्यू भगत, प्रदेश उपाध्यक्ष गोपाळराव सरनायक, विकासकुमार बांगडी प्रदेश संघटक, दत्तप्रसाद आबिलवाडे यानी केली असुन सदरील नियुक्ती बदद्ल
संदीप शिंदे, हरिभाऊ विघने, विष्णू लघाने, जितेंद्र बोरा, सागर जैवाळ,दिपक पवार, नागेश गव्हाले, सामाजिक कार्यकर्त्या पायल जगदीश बुलबुले यांनी निवडी बदद्ल शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments