Type Here to Get Search Results !

आरटीई अंतर्गत प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांकडून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली फी वसुल करणाऱ्या ऑर्चिड इंग्लिश स्कूल वर कारवाईची मागणी.

 आरटीई अंतर्गत प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांकडून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली फी वसुल करणाऱ्या ऑर्चिड इंग्लिश स्कूल वर कारवाईची मागणी.


सामाजिक कार्यकर्त्या पायल बुलबुले यांची निवेदनाद्वारे मागणी




 संभाजीनगर:- पायल जगदीश बुलबुले सामाजिक कार्यकरत्या तथा जिल्हाध्यक्ष महिला मंच यांनी प्राथमिक शिक्षण विभाग जि. प. छत्रपती संभाजी नगर यांना निवेदन देऊन ऑर्चिड इंग्लिश स्कूलची चौकशी करून सदरील शाळेवर आरटीई मान्यता काढून घेण्याची कारवाई ची मागणी केली आहे.वाळूज एमआयडीसी परिसरातील ऑर्चिड  इंग्लिश स्कूल कडून आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी च्या नावाखाली फि वसुल केली जात असल्याच्या पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी गंगापूर यांनी सदरील शाळेला पत्र काढले होते पण त्या पत्रात सदरील शाळेवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही व सदरील काढलेल्या पत्रावर कोणताही जावक क्रमांक दिसून येत नाही त्यामुळे सदरील पत्र शाळेला मिळाले किंवा नाही याबाबत देखील शंका निर्माण होत आहे. तरी सदरील शाळेची चौकशी करून सदरील शाळेवर आरटीई मान्यता काढून घेण्याची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हाध्यक्ष महिला मंच पायल जगदीश बुलबुले यांनी निवेदनाद्वारे करण्यात केली आहे.

Post a Comment

0 Comments