Type Here to Get Search Results !

आदिवासी म्हणजे आदी सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी*..संत रामचरण महाराज

 *आदिवासी म्हणजे आदी सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी*..संत रामचरण महाराज




जळगाव जामोद , ( प्रतिनिधी ), १६ मार्च 

आदिवासी म्हणजे आदि सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी आहेत असे प्रतिपादन शबरीधाम अंबा आश्रम मध्य प्रदेश येथील  संत रामचरण महाराज यांनी फगवा संमेलनात  काढले.सदर संमेलन होळी नंतर फगवा एक लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. फगवा संमेलन १४ मार्च रोजी वसाली  येथे वनवासी सेवा समिती जामोद व फगवा उत्सव समिती वसाली यांच्या संयुक्त रित्या आयोजित केले जाते  वीर हनुमान यांचे आरती नंतर  कार्यक्रमाला सुरुवात झाली.पुढे संत रामचरण महाराज यांनी संबोधित करतांना ,.आम्ही वनात राहतो म्हणूनआम्हाला वनवासी म्हणतात आमचा सनातन हिंदु धर्म अतिशय प्रिय आहे. 'कंधो से उची छाती नही होती,धर्म से बडी कोई जाती नही होती दीपक ही नही बचा तो बाती का क्या करोगे,सनातन हिंदू धर्म ही नही बचा तो जाती का क्या करोगे' हिंदू धर्मावर होणाऱ्या आक्रमणाबाबत त्यांनी सगळ्यांना सतर्क राहण्याचे  आवाहन केले  जे. भारत मातेला आपली माता मानत नाहीत ते आमचे नाहीत.ख्रिश्चन मिशनरी यांना गावात प्रवेश करू देऊ नका,त्यांच्या शाळेत आपल्या मुला मुलींना पाठवू नका.अन्य धर्मीय लोकांच्या काळ्या कारवायाकडे लक्ष द्या,स्वतःच्या धर्मात मरण आले तरी बेहत्तर परंतु पर धर्म स्वीकारू नका दि .२२ मे ला दिल्ली लाल किल्ला येथे आयोजित संघ परिवार क्षेत्राच्या डिलीस्टिंग मोर्चा मध्ये सामील होण्या बाबत त्यांनी सूचना करुन आपले प्रबोधन संपविले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष  गणेश नथ्थाणी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून वि.हि.प.चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख,बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजनजी राठी , खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे,वनवासी कल्याण आश्रमाचे गजाननराव सोलकर, वि.हि.प.चे राजेशजी झापर्डे,गोविन्दजी बर्डे ईत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रमुख वक्ते देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र बोदडे,आभार  राजेंद्र गांधी यांनी  मानले  कार्यक्रमाला वसाडी ग्रा.प. सरपंच सिकंदर बाबर, जळगांव नगर संघचालक मिलिंद जोशी, बुलढाणा खामगांव विभाग जिल्हा अध्यक्ष भाजपा सचिनबापू देशमुख, अमोल अंधारे,प्रकाश बोदडे, प्रदीप भुतडा,ओमजी संघवै,विश्वास पाटील,विजय दहीकर,भाऊराव पाटील, शालिग्राम मानकर,रामेश्वर चोरे,अतुल बनारसे,विष्णू खडसे,जगदीशप्रसाद तिवारी,मगन माली,सोहन डूडवा, धनसिंग,कालू रावत व विश्व हिंदु परिषद,बजरंग दल,वनवासी कल्याण आश्रम,भारतीय मजदूर संघ व परीवारतील शेकडो कार्यकर्ते व हजारो  वनवासी बंधू भगिनी , पत्रकारबंधु उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments