Type Here to Get Search Results !

खामगाव येथे आपत्ती व्यवस्थापन* *जनजागृती प्रशिक्षण* *संपन्न*

 *खामगाव येथे आपत्ती व्यवस्थापन* *जनजागृती प्रशिक्षण* *संपन्न* 


खामगाव :- दि.१८ दि. १८ मार्च २०२६ — राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच तहसिल कार्यालय खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय खामगाव येथे आपत्ती विषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये भूकंप, पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रभावीपणे मदतकार्य कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, आशा सेविका, महसूल कर्मचारी, आपदामित्र आदींना NDRF व SDRF च्या अनुभवी अधिकारी व जवानांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.

विशेषतः, आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीपीआर (CPR) आणि प्राथमिक उपचार (First Aid) यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष सरावाची संधी देण्यात आली. यामुळे उपस्थितांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत आत्मविश्वास व जागरूकता वाढल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमाला खामगावचे तहसीलदार श्री. सुनिल पाटील, नायब तहसिलदार  निखिल पाटील, NDRF चे निरीक्षक फुंदे जालिंदर, SDRF चे उपनिरीक्षक  एस. जी. भंडारे तसेच इतर मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments