Type Here to Get Search Results !

खामगाव येथील शिवांगी बेकर्स (पारले) कंपनीचा गॅस पुरवठा बंद, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी..!

 खामगाव येथील शिवांगी बेकर्स (पारले) कंपनीचा गॅस पुरवठा बंद, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी व्यवस्था


पनाने जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी..!




खामगाव:-(अजयसिंह राजपूत) आखाती युद्धाचा महाराष्ट्रावर गंभीर आर्थिक आणि औद्योगिक परिणाम झाला आहे.खामगाव येथील शिवांगी बेकर्स (पारले) कंपनीचा गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे उत्पादन ठप्प झाले असून, कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सविस्तर वृत्त असे की शिवांगी बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड, खामगाव,या पत्रा‌द्वारे आपल्या निदर्शनास एक अत्यंत गंभीर समस्या आणू इच्छितो. आमचा घटक हा पारले बिस्किट्स प्रा. लि. मुंबईसाठी 'जॉब वर्क' तत्त्वावर बिस्किटांचे उत्पादन करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.सध्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे उ‌द्भवलेल्या इंधन टंचाईचा आमच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, वस्तुस्थिती आपल्या अवलोकनार्थ सादर करत आहोत.प्रकल्पाची सद्यस्थिती

उत्पादन क्षमता दररोज ८० मे. टन बिस्किटांचे उत्पादन होते, त्यासाठी दोन बेकिंग ओव्हनसाठी दररोज सुमारे ३ मे. टन एलपीजी इंधनाची गरज

आवश्यक असून,

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, जळगाव प्लांट पुरवठा केला जात होता.कर्मचाऱ्यांची संख्या आमच्या दोन्ही उत्पादन लाइन्सवर एकूण ४७५ कामगार कार्यरत आहेत.आमचा एलपीजी पुरवठा दि. ११.०३.२०२६ पासून बीपीसीएल जळगाव प्लांटकडून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे

आमची पार्ले-जी उत्पादन लाईन दि. ११.०३.२०२६ पासून बंद आहे.तर राऊंड क्रीम उत्पादन लाईन दि. १७.०३.२०२६ पासून बंद करण्यात आली आहे.

सध्या इंधनाच्या अभावामुळे संपूर्ण उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे.त्यामुळे कामगारांवर संकट ओढवलेले आहे.

आमच्याकडे कार्यरत असलेले ४७५ कामगार पूर्णपणे याच कामावर अवलंबून आहेत. काम नसल्यामुळे या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एवढ्या मोठ्या कामगार वर्गाला विनाकाम सांभाळणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे व्यवस्थापनासाठी कठीण होत असून, प्रकल्प मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.आमची नम्र विनंती आहे की स्थितीचे गांभीर्य ओळखून,आम्हाला आमची किमान एक उत्पादन लाईन सुरु ठेवण्यासाठी किमान ५०% ते ६०% एलपीजी पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आमची विनंती आहे. यामुळे कामगारांना रोजगार उपलब्ध राहील आणि जीवनावश्यक वस्तूंच्या (अन्न/बिस्किट) पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.कृपया या विषयात लक्ष घालून बीपीसीएल जळगाव प्लांटला आवश्यक त्या सूचना देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशाप्रकारे शिवांगी बेकर्सचे संचालक प्रकाश केडिया यांनी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या कडे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments