शेगांव तालुक्यातील मच्छिंद्रखेड येथे जानाई माता यात्रेनिमित्त गुढीपाडव्याचा उत्साह हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
मच्छिंद्रखेड आसरा माता हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने मच्छिंद्रखेड येथे प्रसिद्ध जानाई माता यात्रा भरविण्यात आली असून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
गुढीपाडव्याच्या पहाटे गावकऱ्यांनी घरासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. त्यानंतर जानाई माता मंदिरात विशेष पूजाअर्चा व आरतीचे आयोजन करण्यात आले. यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन तसेच सांस्कृतिक उपक्रम पार पडत आहेत.
यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी उसळली असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच विविध दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थांची स्टॉल्स यामुळे यात्रेला जत्रेचे स्वरूप आले आहे. लहान मुलांसह महिलांचा उत्साह विशेष पाहायला मिळत आहे.
गाव प्रशासन व जलम पोलीस स्टेशन ठानेदार अमोल सागळे व पोलिस कर्मचारी यांच्या वतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एकूणच, मच्छिंद्रखेड येथील जानाई माता यात्रा गुढीपाडव्याच्या निमित्ताने भक्ती, परंपरा आणि उत्साह यांचा सुंदर संगम ठरत आहे.

Post a Comment
0 Comments