Type Here to Get Search Results !

शेगांव तालुक्यातील मच्छिंद्रखेड यात्रेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास दोन महीला विरुद्ध जलंब पोलीस स्टेशन गुन्हा दाखल*

 *शेगांव तालुक्यातील मच्छिंद्रखेड यात्रेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास दोन महीला विरुद्ध जलंब पोलीस स्टेशन गुन्हा दाखल*


(शेगांव प्रतीनीधी)                  -  मच्छींद्रखेड यात्रेत गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास करण्यात आली आहे. ही घटना १९ मार्च रोजी घडली आहे. याबाबत अकोला जिल्ह्यातील दोन तरुणींविरुध्द जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी मच्छींद्रखेड येथे भव्य यात्रा असते. या यात्रेत परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याच अनुषंगाने हिंगणा ईसापूर ता. नांदुरा येथील सौ. नंदा काशिराम अवचार ही विवाहिता सुध्दा आली होती. तिच्या गळ्यातील सोन्याच्या पोथीतील मन्यांपैकी ४.७ ग्रॅम वजनाची वाजनाचे

सोन्याचे मनी व डोरले असा एकूण ७

हजार रुपयाचा ऐवज आरोपी कु. निरजा शंकर भोसले (१८), सौ. रुपाली सचिन भोसले (१९) या दोघींनी लंपास केली आहे. अशी तक्रार सौ. नंदा अवचार यांनी जलंब पोलीस स्टेशन ला दिलेल्या. तक्ररीवरुन  या आरोपी कु. निरजा व सौ. रुपाली यांच्या विरुध्द जलंब पोलिसांनी कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments