नारखेड येथे पत्रकार गजानन डाबेराव सौ. ज्योती डाबेराव यांच्या शुभहस्ते महाकालेश्वर मंदिरात शिवलिंगाची
प्राणप्रतिष्ठा
नारखेड:-नारखेड तालुका नांदुरा येथे नारखेड नांदुरा रोड च्या बाजूला महाकालेश्वर मंदिर बांधकाम करून शिवलिंग स्थापन करण्यासाठी मुरलीधर डाबेराव व सरूबाई सोळंके यांनी प्रथम सहभाग घेतला व सर्व गावकरी मंडळी भावी भक्त यांच्या संकल्पनेतून संपूर्ण गावातून वर्गणी गोळा करून भव्य दिव्य असे महाकालेश्वर मंदिर उभारण्यात आले . येथील भाविक भक्तांनी उज्जैन येथून शिवलिंग व नंदीची मूर्ती आणण्यात आली व १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून शिवलिंगाची संपूर्ण नारखेड गावातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये संत गजानन महाराज बाल टाळकळी भजन मंडळी व गावातील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हर हर महादेव बम बम भोले च्या गजरामध्ये संपूर्ण गावात भक्तिमय वातावरणात व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली . दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ब्राह्मण मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये नांदुरा प्रेस क्लबचे तालुका सचिव श्री गजानन डाबेराव सौ ज्योती डाबेराव सुरेंद्रसिंग डाबेराव सौ. ज्ञानेश्वरी डाबेराव गोपाल डाबेराव सौ. पुनम डाबेराव रामधन डाबेराव सौ.आश्विनी डाबेराव गोपालसिंग डाबेराव सौ. सुनिता डाबेरावअशा पाच जोडप्यांच्या उपस्थितीमध्ये शिवलिंगाचे विधिवंत पूजन होम हवन पूजन श्री गणेशाची आरती घेऊन दुपारी २ वाजता महाकालेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आली यावेळी समस्त गावकरी मंडळी भाविक भक्त यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. तसेच दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व गावकरी मंडळी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व गावातील भाविक भक्त व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष यांनी परिश्रम घेऊन चांगल्या प्रकारे आयोजन केले होते यांचे सर्वांचे महाकालेश्वर मंदिर महिला मंडळाच्या वतीने आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments