(उमाताई बोचरे नांदुरा) नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठानेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा नांदुरा शहरातुन रुटमार्च काढण्यात आला
आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने नांदुरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, मधुबन चौक,जनता चौक, मिहानी चौक, उस्मानिया चौक, पोलीस स्टेशन समोरून, छोटी मज्जित, नुरी मज्जिद, कुरेशी मज्जिद, सायकल पुरा , जामा मस्जिद, ध्रुव चौक, मोतीपुरा मज्जिद, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पावेतो रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये बीएसएफ चे 1 अधिकारी 35 कर्मचारी, पोलीस स्टेशन नांदुराचे 4 अधिकारी 24 अमलदार यांचा समावेश होता आगामी निवडणूक काळामध्ये शहरात तसेच परिसरात शांतता राहावी व आदर्श आचारसंहितेचे अंतोतंतपालन व्हावे याबाबतीत पोस्ट चे वाहनावरील लावलेल्या पीए सिस्टीम मधून जनजागृती करण्यात आली.




Post a Comment
0 Comments