Type Here to Get Search Results !

जोरदार शक्तीप्रदर्शन करत आ.चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

 जोरदार शक्तीप्रदर्शन करत आ.चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.                                      मुक्ताईनगर





प्रतिनीधी:-  ----संदिप घाईट:-मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार आ चंद्रकांत निंबा पाटील यांनी आज जोरदार शक्ति प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल.आदिशक्ती मुक्ताई नागेश्वर महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन जुने गांव येथून रॅलीला सुरवात होऊन ते जेडीसी बँक येथे सभा घेण्यात आली यावेळी चंद्रकांत पाटील,यांनी प्रचंड जनसमुदास संबोधित करतांना मुक्ताईनगर मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ बनवण्याचा निर्धार केला.व महायुतीच्या सर्व सहकार्याचे घटक पक्षाचे व जनतेचे आभार मानले.तसेच नदू भाऊ महाजन ,अशोक भाऊ कांडेलकर, गोपाळराव पाटील ,ङॉ.ऊध्दवदादा पाटील यांची भाषणे झाली.नंतर नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.या ऐतिहासिक क्षणाने मुक्ताईनगर मतदारससंघांच्या भविष्याचा दिशादर्शक ठरण्याची शक्यता असून या यशाच्या प्रवासात जनतेचा भरघोस पाठिंबा चंद्रकांत पाटील यांना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.यावेळी महायुतीचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आठवले कवाडेगट आरपीआय,सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments