33/11 केव्ही उप केंद्र नारखेड नांदुरा मुख्य अभियंता यांचा निष्काळजीपणा ...
(सोपान पाटील नांदुरा)
नांदुरा 33 केव्ही नारखेड अंतर्गत येणाऱ्या नारखेड,अवधा बु. खुर्द गावातील व शेतातील विज मोट्या प्रमाणात खंडित झालेली आहे. यामध्ये उपकेंद्रापासून ते शेतकऱ्याच्या शेतात विज नसते.त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. विज अभियंता यांच्या निष्काळजी पणामुळे शेतकऱ्याला खूप मोट्या नुकसानीचा फटका बसत आहे. हरभरा पेरणी झाली असून शेतातील वीज नाही त्यामुळे शेतकरी पाणी देऊ शकत नाहीत. वीज नसल्यामुळे शेतात रोही, रानटी डुक्कर खूप मोट्या प्रमाणात आहेत.त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका आहे.अभियंता राठोड साहेब यांना वारंवार फोन करून सुद्धा ते फोन उचलत नाहीत. या गावाला वायरमन सुद्धा नाही.तर काही शेतकरी त्यांना भेटायला गेले तर त्यांना ते म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही. तुम्हांला जे करायच आहे ते करा.आमच्याकडे माणसे नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे म्हणतात त्यामुळे शेतकरी हतास झाले आहेत याला जवाबदार अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी व त्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी .


Post a Comment
0 Comments