वडोदा येथे प्रचार निमीत्त महायुतीचे उमेदवार आ.चंद्रकांत पाटील यांंचे जल्लोषात स्वागत.
मुक्ताईनगर प्रतिनिधी (संदीप घाईट):-सर्व दुर प्राराची रणधुमाळी सुरू असुन वडोदा ता.मुक्ताईनगर येथे प्रचार निमीत्त मुकृताईनगर मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आ.चंद्रकांत निंबा पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.गावागावातील जिवाभावाच्या मतदारांशी संवाद साधत होम टु होम भेटी गाटी घेत आहेत.यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त पणे पाटील यांना प्रतिसाद मिळत असून महिला भगिनी औषण करतांना व आशिर्वाद देतांना दिसत आहे.तसेच कार्यकर्त्यां मध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. याप्रसंगी भाजप, राष्ट्रवादी काॅग्रेस अजितदादा पवार गट,आरपीआय आठवले गट तसेच महायुतीचे व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments