Type Here to Get Search Results !

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदुरा वडनेर चांदुर बिस्वा येथे नांदुरा पोलिसांचा रूट मार्च


 आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदुरा वडनेर चांदुर बिस्वा येथे नांदुरा पोलिसांचा रूट मार्च 


महाराष्ट्र दर्शन न्युज


 

नांदुरा:-दिनांक.९ नोव्हेंबर२०२४ रोजी  १०:०० ते १०:४५ वाजताआगामी  विधानसभा निवडणूक संबंधाने नांदुरा शहरामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, मधुबन चौक,जनता चौक, मिहानी चौक, उस्मानिया चौक, पोलीस स्टेशन समोरून, छोटी मज्जित, नुरी मज्जिद, कुरेशी मज्जिद, सायकल पुरा , जामा मस्जिद, ध्रुव चौक, मोतीपुरा मज्जिद, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पावेतो  रूट मार्च काढण्यात आला.तसेच ११:१० ते ११:४० वाजे पावेतो ग्राम वडनेर भोलजी येथे तंटामुक्ती कार्यालय -पोलीस चौकी- विठ्ठल मंदिर सातव मोहल्ला -३७ प्लॉट -जामा मस्जिद ते तंटामुक्ती कार्यालय या मार्गाने व ग्राम चांदुर बिस्वा येथे ११:५५  ते १२:२०वाजे पावेतो बस स्टॅन्ड चांदुर बिस्वा- लेवा खेल-महाराष्ट्र बँक-विठ्ठल मंदिर-गुजरी चौक-पोलीस चौकी या मार्गानेआगामी  विधानसभा निवडणूक संबंधाने  रूट मार्च काढण्यात आला  सदर रूट मार्चमध्ये बीएसएफ  चे १ अधिकारी ३५ कर्मचारी, पोलीस स्टेशन नांदुराचे ०२ अधिकारी १० अमलदार  यांचा समावेश होता आगामी निवडणूक काळामध्ये परिसरात  शांतता राहावी व आदर्श आचारसंहितेचे  तोतंतपालन व्हावे याबाबतीत  पोस्ट चे वाहनावरील  लावलेल्या पीए सिस्टीम मधून निवडणूक संबंधाने जनजागृती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments