उद्योगाचे नाते होते कामगार खात्याचे मंत्री होते*... *उद्योग क्षेत्रामध्ये जळगाव जामोद ची पीछेहाटच (महाराष्ट्र दर्शन न्युज) संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघन वाजलेलं आहे 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी यातून आपला आमदार होणार कोण याचं चित्र स्पष्ट होणार आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळीने वेग घेतलेला आहे विविध पक्षांकडून आपापले जाहीरनामे वचन नामे आधी जनतेला खैरात वाटण्याचे पत्र निघत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत त असलेला आदिवासीबहुल मतदार संघ म्हणून ओळख जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये राज्याचे कामगार मंत्री पद भूषविलेले विद्यमान आमदार आपली चौथी इनिंग पूर्ण करून पाचव्या इनिंगच्या तयारीला लागलेले आहेत या मतदार संघामध्ये तीन तालुक्यांचा समावेश आहे ज्यामध्ये संत गजानन नगरी असलेला शेगाव तालुका सह आदिवासी क्षेत्र असलेला संग्रामपूर तालुका जळगाव जामोद तालुका यांचा समावेश आहे विकासाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी होत असताना या मतदारसंघांमध्ये युवकांच्या रोजगाराच्या समस्यांसाठी मार्ग काढण्यास ज्या मतदारसंघात कुठलाही मोठा उद्योग नाही अशा भागातील कामगारांचे मंत्री राहिलेले विद्यमान आमदार किमान स्वतःच्या मतदार संघामध्ये औद्योगिक विकासाच्यासाठी पिछाडीवर असल्याचं पहावयास मिळत आहे या मतदारसंघांमध्ये असलेली संजय गांधी सूत गिरणी ची अवस्था सर्वश्रुत आहे रोजगारासाठी मोठ्या उद्योगाची गरज या ठिकाणी असताना कामगार मंत्री या नात्याने कुठलाही मोठा उद्योग येथील युवकांसाठी उपलब्ध करू न शकल्यामुळे या आमदार विषयी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरलेला आहे आज या मतदारसंघातील मुले पुणे मुंबई नागपूर नाशिक आदी पर प्रांतात जाऊन आपली व आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळण्याचा काम हे युवक करीत आहे स्थानिक लोकांसाठी रोजगाराची आवश्यकता असताना या ठिकाणी आमदार असलेले कामगार मंत्री पद भूषविलेले औद्योगिक रोजगार मेड इन इंडिया मेक इन इंडिया साठी कमी पडलेले असल्याचं स्पष्ट दिसून येत
Post a Comment
0 Comments