आ.चंद्रकांत पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट.
मुक्ताईनगर प्रतिनिधि संदीप घाईट :-आ.चंद्रकांत पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रवर्तन चौकातील एस.टी महामंडळाच्या बस आगाराच्या जागेत व्यापारी संकुल संकुल उभारणे या कामासाठी आ.पाटील यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता.या कामाला राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे यांनी हिरवी झेंडी दिल्याने आता या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ई निवीदा सूचना क्र. 12(2024-25) नुसार राज्यातील सुमारे 19 जिल्ह्यातील महामंडळाच्या जागेत बांधा,वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर निविदा मागविण्यात आल्या असून यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील आगाराच्या जागेत व्यापारी संकुल बांधकाम करणे या कामाचा समावेश आहे.या निवेदेची निवीदा संच विक्री कालावधी दि.10/10/2024 दुपारी 17/वाजेपर्यंत असून निवीदा संचाची किंमत 25 हजार रुपये ठेवण्यात आली असून आज.चंद्रकांत पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट लवकरच प्रत्यक्षात अवतरणार आहे. यामुळे मुक्ताईनगर येथील छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना हक्काची वस्तु उपलब्ध होणार असून बेरोजगारी देखील संपुष्टात येणार आहे.

Post a Comment
0 Comments