*चर्चा तर होणारच*
*पत्रकारांमध्ये*
आपल्या लेखणीतून समाजासमोर झालेल्या बित्त बातमीचा आरसा समोर ठेवून आपली भूमिका मांडतो त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाते
यामधील मोठा प्रिंट , मीडिया सोडला तर लहान परंतु स्थानिक परिसरात चर्चेचा असलेले वर्तमानपत्र व सोशल मीडियाचे माध्यम याचीच चर्चा राहते त्याच माध्यमातून संपूर्ण परिसरातील घटनाक्रम यामधून सामान्य जनतेस बातमीच्या स्वरूपात प्राप्त होते
तर या पत्रकार मंडळीला मंडळीला जाहिरातीशिवाय काहीच नाही
सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक ठिकाणी दमदार असलेले दमदार पक्षाचे उमेदवार आपल्या परीने पत्रकार बांधवांना जाहिरात व वार्तांकनासाठी मदत उपलब्ध करून देतात यातच जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या विधानसभेला सत्ताधारी , विरोधी व एक पक्ष या प्रमुख पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत
यातील जगातील मोठा पक्ष यांच्याकडून समाधानकारक तर बहुजनांचा असलेला पक्ष त्यांच्या कुवतीनुसार मदत त्या पत्रकारांना पोहोच केली आहे
देशात विरोधात असलेला पक्ष त्यांच्याकडून काही आपल्या मर्जीतील वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना थोडे का होईना दस का दम सहकार्य करण्यात आले तर काही पत्रकारांना तुमचे नाव आल्यावर ते ठरवतील त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाहू सांगत ताटकळत उभे ठेवण्याचा प्रकार या नाम मे दम असलेल्या उमेदवारांकडून होत असल्याने यामुळे वंचीत ठेवलेल्या पत्रकारांमध्ये नाराजी पसरली आहे तर यातील काही पत्रकर ग्रामीण भागातील लगत तालुक्यातील असल्याने दिवसभर थांबून या उमेदवाराची भेट वा जवाबदारी असलेल्या व्यक्तीकडून न झाल्याने नाराजी दाखवीत थंडी वाढलेली असल्याने आप आपल्या घरचा रस्ता धरला आहे

Post a Comment
0 Comments