भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2024 रोजी भरारी व झेप महिला ग्रामसंघाच्या वतीने ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले. याप्रसंगी बोलताना ग्रामसंघ पदाधिकारी सौ. रोठे ताई म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एकता, समता व बंधुत्वाची न्यायाची शिकवण दिली. आपण त्या शिकवणीचा अवलंब केला पाहिजे, यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्षा रोठेताई, खंडेराव ताई, गायकी ताई, भोजने ताई, ज्योतीताई जगताप, सुनीताताई नागपुरे, रुक्मिणीताई नागपुरे,अनिताताई शिंगण, मायाताई देशमुख, हर्षा भांबेरे, मंगलाताई देशमुख, तसेच भरारी व झेप ग्रामसंघातील सदस्य उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments