डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला - ग्रा.पं सदस्य तथा पत्रकार गजानन डाबेराव
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामपंचायत कार्यालय नारखेड येथे अभिवादन
नारखेड ( गजानन डाबेराव) दि ०६ डिसेंबर २०२४ भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून या लोकशाहीमध्ये दिनदलित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार गजानन डाबेराव यांनी केले. नारखेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नारखेड गावचे सरपंच प्रसेनजीत खंडेराव उपसरपंच बबीता डाबेराव ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री गजानन डाबेराव दीपक देशमुख तसेच ग्रामसेवक विशाल दाभाडे कर्मचारी अरुण गाडे शत्रुघन डाबेराव यांच्या शुभहस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रजनन व पुष्पहार अर्पण करून ६८ व्या महापरिनिर्वाण दिन उत्सवात साजरा करण्यात आला तसेच पी एम श्री जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश डाबेराव यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र आखरे सर तांदूळकर सर तांदूळकर मॅडम सोळंके मॅडम कवळकार सर निकम सर तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती .



Post a Comment
0 Comments