*सकल मराठा समाज नांदुरा*
*निवेदन निवेदन निवेदन....*
*अत्यंत महत्वाची सूचना*
*राजकीय व सामाजिक वैमनस्यातून मानवतेला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीड जील्हातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना निर्दयी क्रूर पने मरे पर्यंत मारझोड करून, त्यांचा खुन कऱण्यात आला आहे.या घटनेचा निषेध करण्या करिता, तसेच या घटनेतील व प्राथमिक स्तरावर अटक असलेल्या आरोपींची कसून चौकशी करुण मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी तसेच ह्या गुन्ह्याची केस जलद न्यायालयात चालवून दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे या मागणीसाठी तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेब नांदुरा व ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन नांदुरा यांना निवेदन सादर करावयाचे आहे. तरी राजमाता मॉ.जिजाऊ,छत्रपती शिवराय, छत्रपति संभाजी महाराज,छत्रपति राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित असलेल्या व निर्भीड पने मानवतेच्या बाजूने लढण्याची इच्छा असलेल्या बांधवांनी कोणत्याही फोन किंवा निमंत्रण, आमंत्रनाची वाट न पाहत स्वयंम स्फुर्तीने इतर समाज बांधवांना सोबत घेऊन दिनांक 16 डिसेंबर 2024 वार सोमवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता तहसील कार्यालय नांदुरा येथे निवेदन देण्यास हजर रहावे ही विनंती*
दिनांक:-16/12/2024
वार:- सोमवार
वेळ:- सकाळी ठीक 11 वाजता
ठिकाण:- तहसील कार्यालय नांदुरा.
*विनीत*
*सकल मराठा समाज नांदुरा*

Post a Comment
0 Comments