ठाणेदार श्री विलास पाटील यांची धडक कारवाई
आज दिनांक 17/12/2024 रोजी पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्यासोबत पोलीस स्टाफ ने त्यांना मिळालेले खबरे प्रमाणे- रेल्वे गेट नांदुरा जवळ नाकाबंदी करत असताना नाकाबंदी दरम्याण एका महीद्रां सुप्रो वाहनामध्ये गोवंश तिन नर जातीचे बैल आखुड दोरीने बांधुन त्यांना खाण्यासाठी चारा व पिण्याकरिता पाण्याची सोय न करता वेदनादायक स्थीतीत दाटीनें भरुन त्यांना आखुड दोरीने बांधुन जख्मी अवस्थेत तसेच जनावरे यांना हालचाल करण्यास पुरेशी जागा, प्रकाश व हवा मिळणार नाही असे निर्दयतेने जनावरे वाहनात कोंबुन वाहतुक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष तिन मोठे गोवंश जातीचे बैल किंमती 43000/- रु एक जुनी वापरती महींद्रा सुप्रो गाडी किमंती अंदाजे 3,00,000/- असा एकुण 3,43,000/- रु चा मुददेमाल मिळुन आल्याने सफौ इंगळे बन 563 यांचे लेखी तक्रारीवरून आरोपी नामे शेख यामीन शेख हमीद वय 50 वर्षे रा. सारा नगर नांदुरा जि बुलडाणा याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक-695/2024 कलम 11 (1) (C), 11 (1) (G), 11 (1) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960
सहकलम ५ (अ) (१), ५ (अ) (२), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा १९७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपाससफौ इंगळे बन 563 पोना उमेश भारसाकळे हे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे करत आहेत.




Post a Comment
0 Comments