*(राजु घाटे बुलढाणा)
चायनीज मांजा विक्री व साठवनुक करणारे नांदुरा येथील ३ आरोपीवर नांदुरा पोलीसांची कारवाई*
मा.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांचे आदेश क्रमांक- गृह विभाग/ कक्ष-4(1)/778/2024दि.24/1212024 यांचे नायलांन, चायनीज मांजा विक्री व साठवणूक करण्यास मनाई जारी आहेत. पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीमध्ये उपरोक्त मनाई आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये याकरिता आम्ही सर्व पतंग विक्री करणारे व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना चायनीज नायलॉन मांजा ची विक्री करू नये करिता प्रत्यक्षरीत्या भेटून माहिती देण्यात आली होती परंतु तरी सुद्धा आरोपी नामे 1. विराज गजानन चव्हाण देशमुख वय 25 वर्ष रा. आनंद नगर नांदुरा, 2.आरोपी नामे आकाश रामकृष्ण वराडे वय 25 वर्ष रा. शिवशंकर नगर नांदुरा, 3.विजय पांडुरंग वानखेडे वय 46 वर्ष रा.पाण्याचे टाकीजवळ नांदुरा. शासनाचे आदेशाचे उल्लंघन करून त्यांच्या कब्जामध्ये असलेला चायनीज मांजा विक्री करताना मिळून आले आरोपीतांचे कब्जातून एकूण 10 चायनीज माझ्या बंडल एकूण किमती 10 हजार रुपये चे जप्त करण्यात आले आहे, नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक 710/2024 व अपराध क्रमांक 711/2024 कलम 123,125 भा.न्या.सं, सह कलम 5,15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे, सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत तसेच गोपनीय रित्या अधिक माहिती काढून चायनीज नायलॉन मांजा विक्री करणारे व्यापारी व किरकोळ विक्रेते सर्व वर कठोर कायदेशीर कार्यवाही नियमित रित्या करण्यात येणार आहे.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांची मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकातील पोहेका मिलिंद जंजाळ, कैलास सुरडकर, विनायक मानकर, सुनील सपकाळ, रवी झगरे, यांनी केली आहे.
तरी सर्व नागरिकांना आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा आवाहन करतो की आपले मुलांना चायनीज नायलॉन मांजाचा वापर करू देवु नये त्याकरिता योग्य समज द्यावी तसेच चायनीज मांजा कुणी विक्री करत असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशन नांदुरा येथे गोपनीय माहिती द्यावी, मांजा विक्री करणारे व्यक्तींवर कायदेशीर रित्या कठोर कारवाई करण्यात येईल, कारण सदर चायनीज नायलॉन माझ्या हा पक्षी व मानवी जीवितास हानिकारक आहे, चायनीज नायलॉन मांजामुळे नांदुरा शहरासह महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी मोटरसायकल स्वरांचे गळे चिरल्याची घटना घडल्या आहेत व घडत आहेत व त्याचप्रमाणे चायनीज माझ्यामुळे इतर अपघात सुद्धा होत आहेत. तरी चायनीज नायलॉन मांजा कोणीही खरेदी करू नये किंवा विक्री करू नये हे एक सुज्ञ नागरीक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आपले सह इतर नागरिकांचे, पक्षांचे जीविताचे रक्षण करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.

Post a Comment
0 Comments