*खामगांव शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या* *फाटकपुरा येथे घरातून २लाखाचा गुटखा*
*जप्त*
खामगाव - फाटकपुरा येथे दोन घरात अवैध विमल गुटखा असल्याची माहिती स्थागुशा बुलढाणा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घरामध्ये छापा टाकून २ लाख २१ हजार ४८ रुपयाचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी ५ वाजता केली. मोहम्मद साबीर अब्दुल कादर (४७) रा.फाटकपुरा व अलिशान बी बनेखा (फरार) या दोघांच्या घरात पोलिसांनी छापा टाकला असता त्यामध्ये विमल पान मसाला तसेच राजनिवास गुटख्याच्या पुड्या एका पांढऱ्या रंगाच्या पोतडीत मिळून आल्या.
दोन्ही घरात एकूण २ लाख २१ हजार ४८ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. स्थागुशाचे पीएसआय पंकज सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी मोहम्मद साबीर अब्दुल कादर रा. फाटकपुरा व अलिशान बी बनेखा रा. फाटकपुरा (फरार) या दोघांविरुध्द कलम २६०, २२३, २७४, २७५, १२३ BNS सह कलम अन्न सुरक्षा मानके कायदा कलम २००६ कलम 26 (2) (i), 26 (2) (iv), 27 (3) (d), 27 (3) (e), 3(1) (zz) (iv) शिक्षापात्र कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments